विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला राज्यपालांच्या हस्ते हिरवा झेंडा

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईत कुलाबा इथल्या शहीद स्मारकात विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. १६ डिसेंबरला साजऱ्या होणाऱ्या ५४व्या विजय दिनानिमित्त लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्र मुख्यालयांनी ही मॅरेथॉन आयोजित केली आहे. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले  सैन्य दलातले धावपटू ६ ते १६ डिसेंबर दरम्यान मुंबई, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर आणि पुणे असं ४०५ किमी अंतर पार करणार आहेत. या कालावधीत ‘जाणूया सैन्य दलांना’ ‘सैन्य दलात महिलांना समान संधी’ या विषयावर परिसंवादही आयोजित करण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.