September 8, 2024 3:25 PM | CP Radhakrishnan

printer

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन नाशिक जिल्ह्याला भेट देणार

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन उद्या नाशिक जिल्ह्याला भेट देणार आहेत. उद्या सकाळी ते ओझर इथं पोहोचोतील, यानंतर ते शासकीय विश्रामगृहात नाशिक जिल्ह्यातले खासदार आणि आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या विविध यंत्रणांची आढावा बैठकही ते घेणार आहेत. यासोबतच उद्या दुपारी ते राजकीय पक्षांचे नाशिकमधले पदाधिकारी, संघटना प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील तज्ञांसोबतही संवाद साधणार आहेत.