जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी काल नागपुरात विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२व्या दीक्षान्त समारंभात राज्यपाल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या. तर २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.