डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हरित ऊर्जा हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक – राज्यपाल

‘हरित ऊर्जा’ हा भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या धोरणाचा महत्त्वाचा घटक असल्याचं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. जागतिक व्यापार केंद्राच्या मुंबई विभागानं आयोजित केलेल्या, ‘शाश्वत विकासासाठी हरित आणि नवीकरणीय ऊर्जा’ या विषयावरच्या जागतिक व्यापार प्रदर्शनात बोलत होते. महाराष्ट्र राज्य, सौरऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं आणि बायोएनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये आघाडीवर असल्याचं ते यावेळी म्हणाले.