डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त ७ सदस्यांचा शपथविधी

विधानपरिषदेच्या 7 राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी काल झाला. विधान परिषदेच्या सभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी या आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यात चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग राठोड, पंकज भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांचा समावेश आहे.

 

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवलेला असताना या नियुक्त्या केल्याचं या याचिकेत म्हटलं होतं. मात्र, राज्यपाल निर्देशित 12 आमदारांच्या नियुक्तीला कोणत्याही प्रकारची हंगामी स्थगिती नव्हती किंवा सरकारनंही या नियुक्त्या करणार नाही अशी हमी दिली नव्हती. त्यामुळे आम्ही 12 पैकी 7 जणांच्या नियुक्त्या केल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणी अंतिम निर्णय देताना याबाबत आपलं मत देऊ असं उच्च न्यायालयानं कालच्या सुनावणीत सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.