डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत – मुख्यमंत्री

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ वयापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर राज्यपालांच्या अभिभाषणावरचा आभारदर्शक प्रस्ताव आवाजी मतदानानं विधानसभेत मंजूर झाला.