‘घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील’

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं  मदत आणि  पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज सांगितलं. या दुर्घटनेतील १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीतून ४ लाख रुपये असे एकूण प्रत्येकी ९ लाख रूपयांचे सहाय्य करण्यात आलं  आहे. 

 

दुर्घटनेत जे आपदग्रस्त सात दिवसापेक्षा अधिक वेळ रूग्णालयात उपचार घेत होते, त्यांना प्रत्येकी १६ हजार रूपये  प्रमाणे एकूण २ लाख ८ हजार रूपयांचं अर्थ सहाय्य करण्यात आलं आणि त्यापेक्षा कमी कालावधीसाठी उपचार घेणाऱ्या रूग्णांना प्रत्येकी ५ हजार ४०० रूपये प्रमाणे १ लाख ४५ रूपयांचे सहाय्य देण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ज्या रूग्णांना सहा महिन्यांपेक्षा अधिक उपचार घ्यावे लागतील त्यांच्यासाठी  विशेष बाब म्हणून मुंबई महापालिकेच्या सहकार्यान संबधित रूग्णांवर उपचार करावे असे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.