December 28, 2025 8:02 PM | governt sceme

printer

विविध सरकारी योजनांसाठी वाटप केलेला निधी खर्च झाला नसल्याचा आरोप करणारा व्हिडीओ खोटा असल्याचं सरकारचं स्पष्टिकरण

विविध सरकारी योजनांसाठी वाटप केलेला निधी खर्च झाला नसल्याचा आरोप करणारा व्हिडीओ खोटा असल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. या व्हिडीओत केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता तपासणी विभागाने म्हटलं आहे. केंद्राने पुरस्कृत केलेल्या योजनांसाठी वाटप केलेल्या निधीचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. तसंच, या खर्चाचे हिशोब नियमितपणे ठेवले जातात, त्यामुळे नागरिकांनी सावध राहावं आणि समाज माध्यमावर फिरणाऱ्या कोणत्याही दाव्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सरकारने केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.