केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी, आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचा समावेश आहे. व्ही के सारस्वत, प्रो. रमेश चंद, डॉ व्ही के पॉल आणि आनंद विरमानी हे आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहेत.