डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्रात पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रणासाठी वेगळा कायदा करण्याचं सरकारचं आश्वासन

राज्यात बनावट पॅथॉलोजी लॅबवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा आणला जाईल, अशी माहिती प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली. सुनील राणे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. या स्वतंत्र कायद्यात दरावर नियंत्रण, कलेक्शन सेंटर नोंदणी, फौजदारी कारवाई या संबंधी देखील तरतूद असेल. कायदा आणण्यासाठी विलंब झाला तर सध्याच्या नर्सिंग कायद्यात सुधारणा करून कारवाई केली जाईल, असंही मंत्री सामंत म्हणाले. मुंबईतल्या बेस्ट बस आणि इतर सुट्या भागांची भंगार विक्रीची चौकशी उच्च स्तरीय समिती नेमून केली जाईल अशी घोषणा देखील सामंत यांनी केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.