महाराष्ट्र शासनाचा टोयोटा किर्लोस्करसमवेत सामंजस्य करार

राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार आहे. टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे भारतातल्या मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील क्रांती येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. या प्रकल्पातून इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सचे उत्पादन होणार असून यासाठी २० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्रकल्पातून वर्षाला ४ लाख कार्सची निर्मिती होणं अपेक्षित आहे.