मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा शासन निर्णय आज जारी झाला. राज्याच्या मंत्रिमंडळाने काही दिवसांपूर्वी याला मंजुरी दिली होती. या निर्णयामुळे मच्छिमार, मत्स्य कास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापक, मत्स्यबीज संवर्धक, मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे यांना अनेक पायाभूत सोयीसुविधा आणि सवलती मिळणार आहेत. सवलतीच्या दराज वीज पुरवठा, किसान क्रेडीट कार्ड, बँकांकडून कर्ज, अल्प दरानं विमा संरक्षणाचा लाभ अशा सुविधांचा यात समावेश आहे.
Site Admin | May 9, 2025 8:20 PM
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी
