डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ राज्यभरात विविध ठिकाणी शासन निर्णयाची होळी

राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय शिकवण्यासंदर्भातल्या शासन निर्णयाच्या निषेधार्थ आज राज्यभरात विविध ठिकाणी विविध पक्षसंघटनांनी या शासन निर्णयाची होळी केली. त्रिभाषा सूत्र राज्यात लागू न करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस, माकप, भाकप, वंचित बहुजन आघाडी या पक्षांसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. नाशिकमधल्या शालीमार चौकात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदी सक्तीला विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली. बीड, हिंगोली, भंडारा इथंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शासनादेशाची होळी केली.