रत्ने आणि आभूषणे क्षेत्रासाठी राज्यशासनाने नवीन धोरण जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या या धोरणाचा शासननिर्णय आज जारी झाला. या क्षेत्रात पुढच्या ५ वर्षांच्या कालावधीत एक लाख कोटी रुपये गुंतवणूक ५ लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. देशाच्या एकूण रत्न आणि आभूषण क्षेत्रात महाराष्ट्राचा वाटा १८ टक्के आहे.
या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण, नवोन्मेष, रोजगारनिर्मिती, व्यवसाय सुलभता इत्यादींना चालना देण्यात येणार असून त्याकरता चालू आर्थिक वर्षात १०० कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. २०३० पर्यंत या धोरणाचा कालावधी असून तोपर्यंत त्याअंतर्गत प्रोत्साहनांवर १ हजार ६५१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.