राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यासाठी नगर विकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सरकारने दिले आहेत. दुर्गंधी आणि रोगराई फैलावू नये या दृष्टीनं मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळामध्ये याबाबतचा प्रश्न विचारून पाठपुरावा केला होता.
Site Admin | April 26, 2025 3:26 PM
राज्यात पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी तयार करण्याचा सरकारचा निर्णय
