अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून यासंदर्भातलं विधेयक या अधिवेशनात आणून त्यानुसार कारवाई केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केली. आमदार परिणय फुके यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. असे गुन्हेगार एका राज्यात अटक होऊन जमीन मिळाल्यानंतर दुसऱ्या राज्यात जाऊन तिथे गुन्हे करतात, हे टाळण्यासाठी सर्व राज्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं. अशा गुन्हेगारांविरुद्धचे खटले जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक पावलं सरकार उचलत असून व्यसनमुक्ती केंद्रं उभारण्याचं कामही सुरू असल्याचं ते म्हणाले. तसंच NDPS अंतर्गत अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठीही विविध पावलं उचलली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मध्य प्रदेशच्या सीमेवरून राज्यात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्यास त्याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.
Site Admin | July 2, 2025 8:27 PM | CM Devendra Fadnavis | drug smugglers | Maharashtra Government | MCOCA
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा सरकारचा निर्णय
