September 3, 2024 8:30 PM

printer

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना केंद्र सरकारची मंजुरी

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत १० भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. या सोबतच या बैठकीत भविष्यवेधी लढाऊ वाहनं, हवाई संरक्षणविषयक प्रक्षेपक नियंत्रक रडार, डॉर्नियर-२२८ विमाने तसंच गस्तीच्या अत्याधुनिक जहाजांच्या खरेदीलाही मंजुरी दिली गेली.

 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.