संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन

संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर  सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.  या अधिवेशनात  मतदार पुनरिक्षण, दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या पार्श्वभूमीवर संसदेचं कामकाज सुरळीत चालावं अशी भूमिका सरकारतर्फे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू तसंच राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडली. जयराम रमेश, गौरव गोगोई, प्रमोद तिवारी या काँग्रेसच्या नेत्यांनी तसंच डीएमके चे टी आर बालू, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन तसंच IUML चे ई टी मोहम्मद बशीर यांनी विरोधी पक्षांची भूमिका मांडली. आरजेडीचे मनोज झा, संयुक्त जनता दलाचे संजय झा, अकाली दलाच्या शिरोमणी अकाली दलाच्या हरसिम्रत कौर हे नेतेही बैठकीला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.