पर्यायी इंधनांमुळे भारताचं पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते -नितिन गडकरी

मिथेनॉल, इथेनॉल आणि बायो सीएनजी सारख्या पर्यायी इंधनांमुळे भारताच पेट्रोलियमवरचं अवलंबित्व कमी होऊन आयातीत घट होऊ शकते असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय मिथेनॉल कार्यशाळेत बोलत होते. सध्या पेट्रोलियमच्या आयातीवर दरवर्षी २२ लाख कोटी रुपये खर्च होतात. पर्यायी इंधन उत्पादन वाढल्यास हा खर्च घटेल , शिवाय प्रदूषणही कमी होईल असं ते म्हणाले. भारत जैविक इंधनाच्या उत्पादनात विशेषतः मिथेनॉलच्या उत्पादनात मोठी प्रगती करत असून अनेक राज्यांमध्ये तांदळाच्या कोंड्यापासून बायो सीएनजी चे उत्पादन सुरु झालं आहे . पिकांची धाटे वापरून पर्यायी इंधन तयार होऊ शकतं आणि धाटे जाळून होणाऱ्या प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते असं ते म्हणाले. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.