पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद यशवंत पाटील आणि श्रद्धा धवन यांनी पुरस्कार पटकावले आहेत.
अरविंद पाटील यांनी पहिला क्रमांक मिळवला असून श्रद्धा धवन यांना तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. याखेरीज दूध उत्पादक संस्था, कृत्रिम रेतन तंत्रज्ञ या श्रेणींमध्येही पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली आहे. रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. हा पुरस्कार पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातल्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानांपैकी एक आहे.