वस्तू आणि सेवा कर परिषदेने या कराच्या रचनेत नुकतेच क्रांतिकारी बदल केले.
पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं लहान मुलांच्या वापरातल्या विविध वस्तूंवरच्या करात कपात करण्यात आली आहे. त्यात बालकांना दूध पाजण्याच्या बाटल्या, निपल्स, डायपर्स, लहान मुलांची खेळणी, विशेषतः देशातल्या हस्तकला कारागीरांनी बनवलेल्या बाहुल्या, इत्यादींवर १२ टक्के ऐवजी ५ टक्के कर राहणार आहे.
पेन्सिल शार्पनर आणि खोडरबर यांच्यावरचा कर शून्य टक्के झालाय तर शालेय वह्या पुस्तकं, प्रयोगवह्या, ग्राफ वह्या, नकाशे, अध्यापनोयोगी उपकरणं यांच्यावरही शून्य टक्के कर राहील. कंपासपेट्या आणि रंगपेट्या, मुलांच्या तीनचाकी सायकली, हँडमेड कागद, दप्तरं, पाऊचेस, पत्त्यांचे कॅट, कॅरमबोर्ड आणि इतर बैठ्या आणि मैदानी खेळांचं साहित्य यावरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के झाला आहे.
उंची दर्जाचे विशेष वापरासाठीचे कागद, पॅकिंगसाठी वापरले जाणारे कोरोगेटेड पुठ्ठे या सामुग्रीवरचा कर १२ ऐवजी १८ टक्के करण्यात आला आहे. नवीन कररचना येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.)