गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातल्या खडकी गावात आज बिबट्याच्या हल्ल्यात एका चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. बिबट्यानं आज सकाळी मुलावर हल्ला करत त्याला घरातून फरपटत नेलं. गावकऱ्यांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केल्यावर मुलाला अर्ध्या वाटेत सोडून बिबट्या पसार झाला. मात्र, तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला.
Site Admin | January 9, 2026 3:28 PM | Gondia
गोंदियात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षाच्या मुलाचा मृत्यू