महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेनं आज गोंदियात प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन केलं. शासकीय कामाकरता लॅपटॉप द्यावा, कृषी सेवकांना कृषी सहायक पदावर नियुक्त करावं, कृषी सहायकाचं पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावं, कृषी सहायकांना मदतनीस देण्यात यावा आदी मागण्या आंदोलकानी केल्या. त्याचप्रमाणे कृषी विभागाच्या आकृतीबंधाला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही आंदोलकानी केली आहे. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा कृषी आंदोलकांनी दिला आहे.
Site Admin | May 19, 2025 7:08 PM | Gondia
महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचं धरणे आंदोलन
