गोळी सोड्याला आता नवी ओळख !

भारतात पूर्वीपासून मिळणारा गोळी सोडा आता साऱ्या जगात गोळी पॉप सोडा या नवाने ओळखला जाईल असं कृषी आणि प्रक्रीयाकृत अन्नपदार्थ विकास प्राधिकारणाने सांगितलं आहे. हे पेय जागतिक स्तरावर लोकप्रिय असून त्यातल्या नाविन्यामुळे ग्राहकांचं आकर्षण ठरत आहे. अमेरिका, युके, युरोपातले अन्य देश आणि आखाती देशांमधे या पेयाला मागणी वाढत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.