मुंबईच्या सराफा बाजारात आज सोन्याचे दर तोळ्यामागे करांसह दीड लाख रुपयांच्या पलीकडे गेले तर चांदीनं किलोमागे करांशिवाय ३ लाखांचा टप्पा ओलांडला.
सोनं आज तोळ्यामागे सुमारे ३ हजार ४०० रुपयांनी महाग झाल्यानं एक तोळा २४ कॅरेट सोन्याच्या किंमत १ लाख ५१ हजार ८०० रुपयांच्या पलीकडे गेली. २२ कॅरेट सोन्यासाठी १ लाख ४८ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होते. दिवसभरात चांदी किलोमागे १५ हजार ३७० रुपयांनी महाग झाली आणि करांसह एक किलो चांदीसाठी ३ लाख १८ हजार ६२५ रुपये मोजावे लागत होते.