डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशात सोन्याच्या दराने गाठला तोळ्यामागे १ लाख रुपयांचा टप्पा

देशात सोन्याच्या किमतींनी आज तोळ्यामागे १ लाख रुपयांची पातळी ओलांडली. इंडियन बुलियन अँड ज्वेलरी असोसिएशनने दिलेल्या दरांनुसार सकाळी व्यवहार सुरू झाला तेव्हा २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १ लाख २ हजार रुपयांपेक्षा महाग मिळत होतं.

 

२२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख १ हजार ६०० रुपयांपेक्षा अधिक झाले होते. कालच्या तुलनेत सोनं सुमारे अडीच हजार रुपयांनी महागलं. चांदी सुमारे ९८ हजार ८०० रुपये किलोनं मिळत होती. कमोडिटी बाजारातही सोन्याचे व्यवहार १ लाख रुपयांच्यावर होत आहेत. 

 

 जगभरातल्या केंद्रीय बँकांनी वाढवलेली सोनं खरेदी तसंच सोनं ही सुरक्षित गुंतवणूक वाटत असल्यानं गुंतवणूकदार सोनं खरेदीकडे वळत असल्याचं तज्ञांचं मत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्यातल्या तणावामुळेही सोन्याच्या किंमती वाढल्याचं तज्ञ म्हणतात.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.