गोलकीपर्स चँपियन सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना प्रदान

बिल गेट्स यांच्या गेट्स फाऊंडेशनचा गोलकिपर्स चँपियन्स सन्मान ‘सर्च’ संस्थेचे संस्थापक डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना काल न्यू यॉर्क इथं झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या वतीने आनंद बंग यांनी पुरस्कार स्वीकारला. बंग दांपत्यानं सार्वजनिक आरोग्य आणि विशेष करून बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या कल्पक उपाययोजनांची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.