वीज महावितरण कंपनीने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचं राज्य सरकारनं दिलेलं उद्दिष्ट ८२ दिवसांत पूर्ण केलं आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली.
पाच डिसेंबरपर्यंत राज्यात ७१ हजार ४३७ तर त्यानंतर शंभर दिवसांच्या मोहिमेत ८२ दिवसांत ५७ हजार ३३ घरांवर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात आले. राज्यातल्या लाभार्थी कुटुंबांना एकूण ८०० कोटी रुपयांचं अनुदान खात्यात थेट जमा करण्यात आलं आहे. याअंतर्गत लाभार्थी संख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. नागपूर पहिल्या, पुणे दुसऱ्या, तर जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.