गोवा राज्याच्या स्थापनादिवसानिमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा

गोवा राज्याच्या स्थापनादिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्याची समृद्ध परंपरा, पाहुणचार करण्याची वृत्ती, निसर्गरम्य समुद्रकिनारे यांचं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे विशेष उल्लेख केला. गोव्याचा समृद्ध वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी गोव्यातील जनता आणि पर्यटकांनी मिळून काम करावं, असं आवाहन त्यांनी केलं.