December 11, 2025 1:00 PM

printer

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले लुथरा भावंडं थायलंड पोलिसांच्या ताब्यात

गोवा नाइट क्लब आग प्रकरणातले आरोपी आणि क्लबचे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. गोव्यातल्या अरपोरा इथल्या क्लबमध्ये गेल्या शनिवारी आग लागून २५ जणांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते.

 

त्यांच्याविरुद्ध इंटरपोल ब्लू कॉर्नर नोटिस जारी करण्यात आली होती. भारत सरकारच्या विनंतीवरून आज त्यांना फुकेत इथून ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांना भारतात परत आणायची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.