गोव्यात नाईटक्लबमधे आग लागून २५ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दाखल झालेल्या दिवाणी दाव्याचं रुपांतर मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठानं जनहित याचिकेत केलं आहे. बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबला परवानगी दिल्याबद्दल राज्यसरकारकडून न्यायालयानं जबाब मागितला आहे. क्लबच्या जमिनीचे मालक प्रदीप घाडी आमोणकर आणि सुनील दिवकर यांनी हा दावा दाखल केला आहे. न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने पुढची सुनावणी येत्या ८ जानेवारीला ठेवली आहे.
Site Admin | December 15, 2025 6:14 PM | Goa Fire
Goa Fire: मृत्यू प्रकरणी दाखल झालेल्या दिवाणी दाव्याचं रुपांतर जनहित याचिकेत