देशातल्या आर्थिक तत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल साक्षरतेत कमी पडणाऱ्या नागरिकांना तसंच वरिष्ठ नागरिकांनाही सहज वापरता येतील अशा प्रकारची उत्पादनं आणि सेवा सादर कराव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ते काल बोलत होते. डिजिटल फसवणुकीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालुन माहितीचं संरक्षण तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं ते म्हणाले. देशात सध्या १० हजार हुन जास्त फिनटेक कंपन्या असून जगभरातल्या गुंतवणूकदारांसाठी या क्षेत्रात संधी उपलब्ध असल्याचं त्यांनी म्हटलं.
Site Admin | October 9, 2025 1:16 PM | Global Fintech Fest 2025 | RBI
ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं संबोधन…