लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या ११ वर्षात ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या १६ पटींची वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्धाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्टसिटीमधले परकीय चलनाचे व्यवहार तत्काळ पूर्ण व्हावे यासाठीच्या नव्या यंत्रणेचं अनावरण त्यांनी केलं. यापूर्वी या व्यवहारांना ३६ ते ५४ तास लागत होेते.
ग्राहकांना सुरक्षितरित्या पैसे हस्तांतरित करता यावे यासाठी सेबी आणि एनपीसीआय यांनी वैध युपीआय आणि सेबी चेक सुविधा सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. या अंतर्गत म्युच्युअल फंडांच्या युपीआयमध्ये .MF तर शेअर दलालांच्या युपीआयमध्ये .BRK असणार आहे.