जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीची सुरुवात उद्यापासून लंडन इथं होणार आहे. या स्पर्धेत एकूण ३६ खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात सध्याच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, द्वितीय मानांकित हिकारू नाकामुरा, तसंच सर्वात तरुण बुद्धिबळपटू असलेला अलिरेझा या खेळाडूंचा समावेश असेल. भारताकडून आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगैसी, विदित गुजराथी, आर. वैशाली, कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली हे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील. येत्या १२ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा समारोप होईल.
Site Admin | October 3, 2024 1:47 PM | Global Chess League
जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची दुसरी आवृत्ती उद्यापासून लंडन इथं सुरू होणार