डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 22, 2025 1:38 PM | Gita gopinath

printer

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ पदमुक्त होणार

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ पुढच्या महिन्यात पदमुक्त होतील. त्यानंतर त्या हार्वर्ड विद्यापीठातल्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. गीता गोपीनाथ जानेवारी १९ मधे मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत रूजू झाल्या होत्या. जानेवारी २०२२ मधे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना बढती मिळाली.  गीता गोपीनाथ यांनी अनिश्चित काळात सर्वोच्च मानकं प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तलीना जॉर्जिवा म्हणाल्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा