कझाकस्तानमधल्या शिमकेंत इथं सुरू असलेल्या 16 व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गिरीश गुप्ता यानं युवा पुरुष गटात 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. 17 वर्षाच्या गुप्तानं अंतिम फेरीत 241 पूर्णांक 3 गुण मिळवत बाजी मारली, तर त्याचा 14 वर्षीय भारतीय प्रतिस्पर्धी देव प्रताप यानं 238 पूर्णांक 6 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली.
तत्पूर्वी कनिष्ठ पुरुष गटात एअर पिस्टल मध्ये कपिल बैंसला यानंही सुवर्ण पदकावर नाव कोरलं. भारताच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ दोन्ही संघांनी रौप्य पदक मिळवलं. अशा प्रकारे काल दिवस अखेर भारताच्या खात्यात दोन सुवर्ण आणि तीन रौप्य पदकं जमा झाली. आज या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या एअर पिस्टलच्या अंतिम फेऱ्या होणार आहेत.