डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गाझा शहर ताब्यात घेण्याच्या आक्रमक योजनांदरम्यान जर्मनीची इस्रायलला लष्करी निर्यात स्थगित

इस्रायलच्या सुरक्षा विषयक मंत्रिमंडळाने गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मंजुरी दिल्याच्या पार्श्वभूमीवर, जर्मनीने इस्रायलला होणारी सर्व लष्करी सामग्रीची निर्यात स्थगित केली आहे.  जर्मनीचे चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी काल हा निर्णय जाहीर केला. सध्याच्या  परिस्थितीत, जर्मन सरकार पुढली सूचना मिळेपर्यंत गाझा पट्टीत वापरता येण्याजोग्या कोणत्याही लष्करी उपकरणांच्या निर्यातीला मंजुरी देणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. 

 

इस्राएलनं गाझा पट्टीत छेडलेल्या या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, आणि उपासमारीचं संकट निर्माण झालं आहे. या युद्धा विरोधात जगभर निषेध व्यक्त होत आहे.