जर्मनीमध्ये ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियन या विरोधी पक्षांनी सर्वसाधारण निवडणुकीत विजयी आघाडी घेतली आहे. या पक्षांचे नेते फ्रेडरिक मर्झ हे पुढचे चॅन्सलर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिकेप्रमाणेच जर्मनीचे नागरिकही व्यवहारशून्य प्रशासनाला कंटाळले आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही मर्झ यांचं निवडणुकीतल्या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे.
Site Admin | February 24, 2025 1:51 PM | Germany Election
जर्मनी निवडणुकीत विरोधी पक्षांची विजयी आघाडी
