October 16, 2025 1:15 PM

printer

ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमिन भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर

ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष गेराल्डो अल्कमिन हे भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज नवी दिल्लीत उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. त्यानंतर आज दुपारी ते वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्याबरोबर द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतील.

 

अल्कमिन यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि ब्राझील द्विपक्षीय व्यापार भागीदारी आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. अलिकडेच, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ब्राझील दौरा केला होता, यावेळी व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी मंत्रीस्तरीय आढावा यंत्रणा स्थापन करायला आणि पुढच्या पाच वर्षांत २० अब्ज डॉलर्सच्या उलाढालीचं लक्ष्य निश्चित करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.