October 11, 2024 1:53 PM

printer

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका

श्रीलंकेत येत्या १४ नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक निवडणुका होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज दुपारपर्यंत संपेल. श्रीलंकेच्या निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार एकूण ३३ स्वतंत्र गट आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी श्रीलंकेचे मतदार जिल्हा पातळीवर १९६ उमेदवारांचं आणि राष्ट्रीय पातळीवर २९ उमेदवारांचं भविष्य ठरवणार आहेत.