श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा, येत्या १४ नोव्हेंबर रोजी होणार मतदान

श्रीलंकेत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून येत्या १४ नोव्हेंबर रोजी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी ४ ते ११ ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. श्रीलंकेचे मुख्य निवडणूक आयुक्त सामन श्री रत्नायके यांनी प्रसारमाध्यमांना या निवडणुकीविषयी माहिती दिली. या निवडणुकीसाठी राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी ११ अब्ज श्रीलंकन रुपयांचा निधी जारी करण्यास परवानगी दिली असून या निवडणुकीसाठी पोस्टल मतदानासाठीचे अर्ज येत्या ८ ऑक्टोबर पर्यंत स्वीकारले जातील, असं रत्नायके यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.