स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रचाराला वेग

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून विविध पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालना, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विविध प्रचारसभांना संबोधित करत आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, अहिल्यानगर आणि रायगड जिल्ह्यात प्रचार करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा नाशिकमध्ये सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठीचा वेळ वाढवण्यात आली असून १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रचार बंद होईल, असं पत्रक राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी जारी केलं आहे. 

 

राज्यात नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित मतदारसंघांच्या बाहेर राहणाऱ्या मतदारांनाही ही सुट्टी लागू असेल.