डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 23, 2025 10:56 AM | GDP | IMF

printer

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १०५ % वाढीच्या दरानं दुप्पट

भारताचं देशांतर्गत उत्पादन गेल्या १० वर्षांत १०५ टक्के वाढीच्या दरानं दुप्पट झालं आहे. देशाचा जीडीपी २०१५ मध्ये २.१ ट्रिलियन डॉलरवरून २०२५ मध्ये ४.३ ट्रिलियन डॉलर झाला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर जीडीपीच्या बाबतीत भारत आता जगातला पाचवा सर्वात मोठा देश बनला आहे. भारत लवकरच जपानलाही मागे टाकेल, असा अंदाज आहे.