चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. गेल्या जून महिन्यात हा अंदाज ६ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखू शकतो. अमेरिकेने लावलेल्या अतिरिक्त आयातशुल्काचा परिणाम जीडीपी वृद्धीवर होईल, असा इशाराही अहवालात दिला आहे. त्याअनुषंगाने पुढच्या दोन वर्षात जीडीपी वृद्धी दर कमी होईल असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे.
Site Admin | October 7, 2025 8:05 PM | GDP
भारताचा जीडीपी वृद्धीदर ६.५ % राहील, जागतिक बँकेचा अंदाज
