आर्थिक वर्ष २०२४- २५ मधे भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागानं व्यक्त केला आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७ पूर्णांक ४ दशांश टक्के दरानं वाढीचं अनुमान आहे.
या वर्षातल्या एकंदर जीडीपी वाढीचा दर ९ पूर्णांक ८ दशांश टक्के राहिला. बांधकाम क्षेत्राचा यात मोठा हातभार आहे. या क्षेत्राची अनुमानित वाढ ९ पूर्णांक ४ दशांश टक्के आहे. सार्वजनिक प्रशासन, संरक्षण, इत्यादी ८ पूर्णांक ९ दशांश टक्के, तर वित्तीय-स्थावर मालमत्ता- व्यावसायिक सेवा, या क्षेत्रांची वाढ ७ पूर्णांक २ दशांश टक्के असल्याचं सांख्यिकी विभागानं म्हटलं आहे.