गाझा युद्ध संपवण्याच्या पार्श्वभूमीवर, शांतता कराराला अंतिम रूप देण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आज इजिप्तच्या शर्म एल-शेख इथं होत आहे. यावेळी गाझा पट्टीतील युद्ध थांबवण्यावर, तसंच पश्चिम आशियातली सुरक्षितता आणि स्थैर्य या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषावणार आहेत.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर 20 पेक्षा जास्त देशांचे नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री कीर्ति वर्द्धन सिंह या शांति सम्मेलनात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी इस्राईल आणि हमास यांच्यातल्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या कराराचं स्वागत केलं आहे.