गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठीच्या वाटाघाटीत आज कतार आणि तुर्किएचे राजनैतिक अधिकारी सहभागी होणार आहेत. इजिप्तमधे या वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेने ठेवलेल्या वीस कलमी प्रस्तावावर यात चर्चा होणार आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सीसी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्यात काल संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा झाली. गाझामधील संघर्ष तत्काळ थांबला पाहिजे यावर दोन्ही नेत्यांमधे एकमत झालं.
Site Admin | October 8, 2025 2:34 PM
गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठीच्या वाटाघाटीत आज कतार आणि तुर्किएचे राजनैतिक अधिकारी सहभागी होणार