डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 17, 2025 8:08 PM | Gaza | Israel

printer

दक्षिण गाझामधे इस्रायलनं केलेल्या गोळीबारात ५१ ठार, २०० जखमी

दक्षिण गाझामधल्या मदत केंद्राजवळ इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात ५१ जणांचा मृत्यू झाला असून २०० जण जखमी झाले आहेत. इस्रायली सैन्याने खान युनुस शहरातल्या मदत केंद्रावर गोळीबार केला, असं गाझाच्या नागरी संरक्षण संस्थेनं म्हटलं आहे. इस्रायली लष्कराने याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

 

इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्षही सलग पाचव्या दिवशी सुरू आहे. इस्रायलमधल्या तेल अविव आणि जेरुसलेम इथं इराणने क्षेपणास्त्रं डागल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं आहे. तर इस्रालयलवर आतापर्यंतच्या सर्वात तीव्र हल्ल्याची तयारी सुरू असल्याचं इराणनं म्हटलं आहे. 

 

इराण आणि इस्रायल यांच्या संघर्षात अमेरिका आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा