गाझा आणि इस्रायल यांच्यातल्या युद्धबंदी करारानुसार पहिल्या टप्प्यात २० ओलिसांना हमासने इस्रायलकडे सुपूर्द केलं. या बदल्यात इस्रायल वीस हजार पॅलिस्टिनी नागरिकांना सोडणार आहे.
इस्रायली ओलिसांच्या सुटकेचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे. ओलिसांच्या कुटुंबीयांचं धैर्य, शांतता प्रस्थापित करण्यासाठीचे डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न तसंच इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा दृढ संकल्प यामुळे ओलिसांची सुटका झाली असं मोदी म्हणाले.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज इस्रायलची राजधानी तेल अविवमधे पोहोचले, तिथे त्यांनी ओलिसांशी संवाद साधला तसंच इस्रायली संसदेला संबोधित केलं. त्यानंतर ते शांतता परिषदेत सहभागी होण्यासाठी इजिप्तला रवाना झाले. या परिषदेत वीस देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेला इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू हे उपस्थित राहणार नाहीत. युद्धबंधीसाठी महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायलचा सर्वोच्च नागरी सन्मान इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनरनं जाहीर झाला आहे. इस्रायलचे राष्ट्रपती आयझॅक हर्जोग ट्रम्प याना हा पुरस्कार प्रदान करतील. या आधी हा सन्मान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना प्रदान करण्यात आला होता.