October 4, 2025 8:15 PM

printer

गाझामध्ये गेल्या १२ तासात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये  किमान २० जणांचा मृत्यू

गाझामध्ये गेल्या १२ तासात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमध्ये  किमान २० जण मृत्युमुखी पडले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ताबडतोब युद्धविराम करण्याचं आवाहन केलं असलं तरी इस्राएलचे हल्ले सुरु आहेत. मात्र युध्दविरामाच्या आवाहनाला इस्राएलनं सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. ट्रम्प यांच्या शिफारसीनुसार पहिल्या टप्प्याच्या युध्दविरामासाठी तयारी करत असल्याचं इस्राएलच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.